आजादी की जंग नाटकातील बालनाट्य कलावतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

साने गुरूजी स्मारक येथे नाथ पै हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता एकांकिका सादर करण्यात आली. या कार्यक्रमा मागील भूमिका संदेश भंडारे यांनी सांगितली.

सुरुवातीला राष्ट्र सेवा दल पुणे युवा टीम खालील दोन गीते सादर केली.

1) हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे

2) पाडू चला रे भिंत मध्ये आड येणारी  या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी.

सदर गीत खालील युवा टीमने सादर केली. मुस्कान नदाफ, सौरभ शिंपी, प्रफुल्ल कांबळे, तुकाराम डोईफोडे, शुभम माळवे इत्यादी सदर कार्यक्रमांमध्ये खालील सैनिकांनी आदरांजलीपर विचार मांडले. अन्वर राजन यांनी सांगितले की, स्वतंत्रता के समय अहिंसा मूलमंत्र था. उस वक्त स्वातंत्र्य के लिए लोक मरने से नही डरते थे!मुस्कान नदाफ हिने प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिरीष कुमार चा रोल केलेल्या कुमार बालकाने हुबेहूब शिरीष कुमार सादर केला. डोळ्यांमध्ये पाणी आले आणि तिने ‘जबतक मंजिल नही रुकेगी बढती जायेगी ये टोली’ अशी घोषणा देत कार्यक्रमात जोश भरला.पुणे अध्यक्ष दिपाली आपटे यांनी लहान मुलांचे कौतुक करता ना सांगितले की, शिबिरांमध्ये परीट गुरूजी नेहमी शिरीष कुमार यांची कथा सांगायचे त्यांना आठवायचे मुलांना त्याबद्दल सांगायचे. प्रमोद मुजुमदार सरांनी सांगितले की, शिरीष कुमारवर नाटक बनवणे ही खूप मोठी गोष्ट आहे, छान गोष्ट आहे आणि त्यांनी लेखक व दिग्दर्शक देवेंद्र कांदोळकर यांचे अभिनंदन केले. संदीप बर्वे यांनी सांगितले की, ये जो आंदोलन था ये दुनिया का सबसे बडा आंदोलन था शिरीष कुमार ने बहुत बढीया काम किया उनकी ड्रामा देखते हो उनके आखोमे आसु आ गयेें ऐसा प्ले सारे स्कूलओ में होना चाहिए  देवेंद्र कांदोळकर व टीमचे आणि सदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे संदेश भंडारे यांनी आभार मानले या नाट्य प्रयोगास अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त अतुल   देशमुख यांच्या हस्ते देवेंद्र कांदोळकर यांचा सत्कार करण्यात आला.  विश्वस्त प्रमोद मुजुमदार, पुणे अध्यक्ष दिपाली आपटे, संजय गायकवाड, राकेश नेवासकर, निलेश निंबाळकर, राजा कांदळकर, प्रकाश कदम, अन्वर राजन, संदीप बर्वे, पटवर्धन फॅमिलीतील पटवर्धन साहेब, गंगासागर देशमुख, निशा साळगावकर, कमलेश म्हेत्रे, शिवराज सुर्यवंशी, गीता, प्रदीप, साहिल जोरवेकर, वैष्णवी कोळी, दिव्या कांबळे, मानसी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.